कालव्यात अडकलेल्या वाघिणीची सुखरूप सुटका

October 13, 2011 12:01 PM0 commentsViews: 6

13 ऑक्टोबर

नागपूर जिल्ह्यातील भिवापूरजवळ असलेल्या तास या गावातील गोसीखुर्द कालव्यात गेल्या 24 तासापासून अडकून असलेल्या वाघिणीची अखेर वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. काल या परिसरात वाघाची डरकाळी ऐकू आल्याने लोकांनी या भागाची पाहणी केली तेव्हा त्यांना ही वाघिण काळव्याच्या जाळीत अडकून असल्याचे दिसून आली. त्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर नागपूरहून विशेष पथक या वाघिणीच्या बचावासाठी बोलविण्यात आलं. ऑपरेशन टायगर मध्ये वनविभागाचे कर्मचारी आणि पर्यावरणवाद्यांनी तब्बल 24 तासानंतर तीला बेशुध्द करून तीस फुट खोल कालव्यातून बाहेर काढलं. या वाघिणीला अनेक जखमा झाल्या आहेत. त्यामुळे वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू सेंटर मध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.पुढचे काही दिवस या वाघिणीवर उपचार केले जाणार आहे.

close