फोर्स इंडियाला मिळाला ‘सहारा’

October 13, 2011 3:00 PM0 commentsViews:

13 ऑक्टोबर

भारतातल्या पहिल्या वहिल्या फॉर्म्युला वन स्पर्धेला 15 दिवसांचा कालावधी राहिला आहे. आणि याआधीच एक महत्वाची घटना घडली आहे. क्रिकेटमध्ये गुंतवणूक करणार्‍या सहारा समुहाने आता फॉर्म्युला वनमध्येही गुंतवणूक केली आहे. उद्योगपती विजय मल्या यांच्या मालकीच्या फोर्स इंडियामधील काही शेअर्स सहाराने विकत घेतले आहे.

मल्ल्या यांच्या यूबी ग्रुपने 2007 मध्ये एफ वनमधील स्पायकर फेरारी टीम विकत घेतली होती. आणि 2008 साली या टीमचे फोर्स इंडिया असं नामकरण केलं. आता ही टीम सहारा फोर्स इंडिया या नावाने ओळखली जाणार आहे. सहाराने यापूर्वी आयपीएलमधल्या पुणे वारियर्स या टीममध्ये गुंतवणूक केली. तसेच भारतीय क्रिकेट आणि हॉकी टीमलाही सहाराने स्पॉन्सरशिप दिली. यंदाच्या फॉर्म्युला वन हंगामात फोर्स इंडियाची टीम 48 पॉईंटसह सहाव्या क्रमांकावर आहे. येत्या 30 ऑक्टोबरला फॉर्म्युला वनचा थरार भारतात पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे सहाराचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.

close