येवल्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

October 13, 2011 4:31 PM0 commentsViews: 7

13 ऑक्टोबर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 1936 साली 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,' अशी धर्मांतराची घोषणा केली होती. आज या घोषणेला 76 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आज येवल्यातल्या मुक्तीभूमीवर बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. नाशिकजवळच्या येवल्यातल्या कोर्टाच्या मैदानावर एका सभेत त्यांनी ही घोषणा केली होती. म्हणूनच हे मैदान मुक्तीभूमी म्हणून ओळखलं जातं. आजच्या मुक्तिदिनानिमित्ताने मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली.

close