गोंदियात गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारे 5 ट्रक जप्त

October 13, 2011 4:37 PM0 commentsViews: 2

13 ऑक्टोबर

गोंदियात जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे पाच ट्रक पोलिसांनी जप्त केले आहेत. या ट्रकमध्ये जवळपास 400 गायींना कत्तलखान्यात नेण्यात येत होतं. गेल्या महिन्यात पोलिसांनी असेच 21 ट्रक पकडले होते. गोंदियात गेल्या काही महिन्यांपासून गायी अचानक कमी व्हायला लागल्या होत्या. गावकर्‍यांनी जेव्हा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली तेव्हा पोलिसांना या सर्व प्रकार लक्षात आला. गेल्या काही महिन्यांपासून गोंदियासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये गायींची तस्करी होतेय. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याविरुध्द ऍनिमल क्रुएल्टी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close