मराठवाड्याला परतीच्या पावसाने झोडपले ; 16 जणांचा बळी

October 13, 2011 4:44 PM0 commentsViews: 1

13 ऑक्टोबर

एकीकडे हिवाळ्याची चाहुल लागली तर दुसरीकडे अचानकपणे बरसलेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवघ्या मराठवाड्यात पावसामुळे सोळापेक्षा जास्त जणांचा बळी गेले आहेत. तर पन्नासहुन अधिक जनावरांचाही मृत्यू झाला आहे. काढणासाठी तयार असलेल्या सोयाबीन या पीकाचे मोठ्या प्रमामात नुकसान झालंय. तर केळी आणि कापूस या पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. तर मुंबई आणि परिसरात आजही परतीच्या पावसाने हजेरी लावली. भिवंडी भागात पावसामुळे झाड कोसळून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. या परिसरातल्या कामतघर, शिवाजीनगर, वडाळा तलाव या भागात अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. यात जवळपास 15 घरांचे नुकसान झालं आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. यापैकी 3 जण गंभीर जखमी झालेत. तर एका जखमी मुलाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, वाशी या भागांमध्येसुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे.

close