मुंबईत परतीच्या पावसाचा धुमाकूळ ; 1 मुलाचा मृत्यू

October 13, 2011 4:49 PM0 commentsViews: 5

13 ऑक्टोबर

मुंबई आणि परिसरात कालपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने आज दमदार हजेरी लावली. भिवंडी भागात पावसामुळे झाड कोसळून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. या परिसरातल्या कामतघर, शिवाजीनगर, वडाळा तलाव या भागात अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. यात जवळपास 15 घरांचे नुकसान झालं आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. यापैकी 3 जण गंभीर जखमी झालेत. तर एका जखमी मुलाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, वाशी या भागांमध्येसुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे.

close