नाशिक एमआयडीसीत उद्योजकांनीच बांधले बंगले !

October 13, 2011 5:00 PM0 commentsViews: 9

13 ऑक्टोबर

नाशिकमध्ये 20 बड्या उद्योजकांनीच एमआयडीसीच्या जमिनीवर आलिशान बंगले बांधून अतिक्रमण केलं आहे. विशेष म्हणजे उद्योजकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक औद्योगिक सहकारी सोसायटी अर्थात नाईसचे हे सर्वजण पदाधिकारी आहेत. एमआयडीसीच्या जमिनीवर हे बंगले बांधताना त्यांनी परवानगी घेतली नसल्याने एमआयडीसीने आतापर्यंत त्यांना बर्‍याच नोटीसा बजावल्या. मात्र, त्याची उत्तरे न दिल्याने शेवटी या अतिक्रमणाच्या विरोधात सातपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. एकीकडे नाशिकमध्ये उद्योगांसाठी जमीन नसल्याचा प्रश्न धगधगतोय, तर दुसरीकडे उद्योग संस्थेच्या पदाधिकार्‍यांनीच एमआयडीसीच्या जागेवर बांधलेले हे बंगले वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

close