लवासाला परवानगी नाकारली

October 14, 2011 12:39 PM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर

पुण्यातील लवासा सिटीला पर्यावरण मंत्रालयाने झटका दिला आहे. लवासाच्या पहिल्या टप्प्याला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. जोपर्यंत अटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत पर्यावरण मंत्रालयाकडून लावासाला परवानगी नाकारण्यात आली आहे. लवासाचा पहिला टप्पा हा 2 हजार एकरांचा आहे. याअगोदर हाय कोर्टानेसुद्धा लवासाला दणका दिला होता आणि त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने लवासाला आता हा धक्का दिला आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या या निर्णयावर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिले. तर आता लवासाविरोधी या लढ्यात लोकांचा विश्वास वाढेल अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी दिली.

close