रत्नाकर मतकरींना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

October 13, 2011 5:05 PM0 commentsViews: 6

13 ऑक्टोबर

यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार स्विकारण्या संदर्भातील पत्र रत्नाकर मतकरींना मिळाले असून त्यांनी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी मान्यताही दिली आहे. अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकमीर्ंना हा पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षीच्या या पुरस्काराच्या मान्यवर फैयाझ होत्या. यंदा या पुरस्कारासाठी संस्थेनं रत्नाकर मतकरींना सन्मानित केलं आहे. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी अशा सगळ्याचे क्षेत्रात मतकरींनी विपुल लेखन केलं आहे. दर्जेदार लेखन करणारे, साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका मतकरींनी आतापर्यंत लीलया पेलल्या आहेत.

close