बुलढाण्यात उत्सवादरम्यान अपघातात महिलेचा मृत्यू

October 14, 2011 2:35 PM0 commentsViews: 26

14 ऑक्टोबर

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे 350 वर्षापासूनची परंपरा असलेल्या लाटा उत्सवादरम्यान एक उंच लाकूड एका महिलेच्या अंगावर पडून घटनास्थळी तिचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांच्या लाठीमारात 45 वर्षांच्या रमेश आढाव या व्यक्तीचा मृत्यू झाला. दरवर्षी जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथल्या बालाजी मंदिरात बालाजीचं लग्न लावण्याचा एक सोहळा पार पडतो. या उत्सवादरम्यानचं लाटा म्हणजेच 35 फूट उंचीची आणि 2 फूट जाडीची 21 लाकडं एकाच वेळेस खाली पाडली जातात व त्या मंडपाखाली हजारो भाविक उपस्थित असतात. आज या लाटा पाडण्यात आल्या. त्याचवेळी लाकडाखाली दबून शशीकला झोरे या महिलेचा मृत्यू झाला. लाटा फेकण्याचा प्रकार अंधश्रदधेतूनच झाल्याचं आता बोललं जातं आहे.

close