कोल्हापुरात अरविंद केजरीवाल यांचा पुतळा जाळला

October 14, 2011 3:32 PM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर

'भारतीय संसदेपेक्षा अण्णा हजारे मोठे आहेत,असं मत टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्याच्याविरोधात कोल्हापुरात आर.पी.आयच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. शहरातील दसरा चौकात केजरीवाल यांच्या पुतळ्याचं दहन करुन निषेध नोंदविण्यात आला. टीम अण्णांच्या सदस्यांनी संसदेचा अवमान करु नये अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा आर.पी.आय.च्या कार्यकर्त्यांनी दिला.

close