शाळा-कॉलेजच्या आवारात गुटखा विक्रीचा युवकांकडून निषेध

October 14, 2011 4:21 PM0 commentsViews: 1

14 ऑक्टोबर

सरकारने नियम करूनही शाळा – कॉलेजच्या परिसरात सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. याविरोधात नाशिकमधील काही युवकांनी थेट अन्न आणि औषध अधिकार्‍यांनाचं गुटख्याच्या पुड्या भेट देऊन याचा निषेध केला. मानव उत्थान संस्थेच्या वतीनं गेल्या दीड वर्षांपासून याबाबत अर्ज विनंत्या करण्यात येत होत्या. पण, शाळा – कॉलेजेसच्या आवारापासून 100 मीटर अतंरात गुटख्याच्या विक्रीला बंदी असतानाही तिथे सर्रास विक्री सुरू आहे. या नियमाची अमंलबजावणी करण्यासाठी तब्बल 21 अधिकार्‍यांची टीम आहे. पण गुटख्याची विक्री बंद करण्याऐवजी ते दंडात्मक महसूल गोळा करण्यातच मश्गुल आहेत. असा आरोप संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला.

close