…तर खातं काढून घ्या – अजितदादा

October 14, 2011 10:48 AM0 commentsViews: 8

14 ऑक्टोबर

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यातील जनता लोडशेडिंगच्या काळोखात होरपाळून निघाली असताना दिवाळी अगोदरच आघाडीत वादाला तोंड फुटलं आहे. आज अजित पवार यांनी वाटत असेल तर माझं खातंच काढून घ्या असं म्हटलं आहे. लोडशेडिंगविरोधात जनतेनं पुकारलेल्या आंदोलनामागे विरोधी पक्षांचा हात असल्याचा आरोप केला होता. अजितदादांच्या विधानाला माणिकराव ठाकरे यांनी असहमती दर्शवली होती. पण आज अजित पवारांनी काँग्रेसला आता आव्हान दिलं आहे.

राज्यभरात सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी थेट महावितरणाच्या कार्यालयावरच हल्ला चढवला. अनेक भागात 13 ते 14 तास लोडशेडिंग होतं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेक भागात आंदोलन करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांच्या आंदोलनाचा समाचार घेतं. हे आंदोलन विरोधकांचा खटाटोप आहे असा आरोप केला. तसेच राज्यात जैतापूर सारखा प्रकल्प असो किंवा सुफीया सारखा प्रकल्प असो यांना विरोध केला जातो तसेच काही नवीन प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याचा प्रयत्न केला जात असताना तिथेही विरोध करायचा, राज्यात कोळश्याचा प्रकल्प नको, तमुक प्रकल्प नको असा विरोध करणारे पक्षचं जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप अजितदादांनी केला. मात्र लोडशेडिंगबाबत कोणतही राजकारण नाही असं खुद्द काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आज अजित पवारांनी पुन्हा मित्र पक्षालाच आव्हान केलंआहे. त्यांना जर असं वाटत असेल तर त्यांनी माझं खातं काढून घ्यावं असं अजित दादांनी म्हटलं आहे. एकूणच मित्रपक्ष काँग्रेस आणि भाजप, शिवसेनेनं केलेल्या टीकेला वैतागून अजित पवार यांनी हे विधान केल्याची चर्चा होत आहे.

close