टीम इंडिया, जिंकली हो..!!

October 14, 2011 4:34 PM0 commentsViews: 1

14 ऑक्टोबर

इंग्लंड दौर्‍यावर असताना टीम इंडिया अगोदर कसोटी आणि नंतर एकदिवशीय मालिकेत लाजिरवाना पराभव पत्कारावा लागला होता. आता मायदेशी होत असलेल्या मालिकेत इंग्लंड टीमला धूळ चारत दमदार विजयी सलामी दिली आहे. शेवटी आम्ही मायदेशीच हिरो हे टीम इंडियाने सिध्द करून दाखवलं आहे. हैदराबाद वन डेत भारताने इंग्लंडचा 126 रन्सने पराभव केला आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने इंग्लंडसमोर 301 रन्सचं बलाढ्य टार्गेट ठेवलं होतं. धोणी आणि रैनाने फटकेबाजी करत टीमला मोठा स्कोर उभा करुन दिला. धोणीने नॉटआऊट 87 रन्स केले. याला उत्तर देताना इंग्लंडची टीम 174 रन्सवरच ऑलआऊट झाली. रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने या स्पीन बॉलर्सने इंग्लंडची टीम झटपट गुंडाळली. रवींद्र जडेजा आणि आर अश्विननं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

close