मुंबईसह देशभरातील मेट्रो शहरांमध्ये हायअलर्ट जारी

October 14, 2011 11:51 AM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर

काल गुरूवारी हरियाणा येथील अंबालामध्ये मोठ्याप्रमाणावर आरडीएक्सचा साठा जप्त केला. या पार्श्वभूमी खबरदारी घेत गोवा, मुंबईसह देशातील सर्व मोठ्या शहरात हाय अलर्ट घोषीत करण्यात आलेला आहे. इंटेलिजन्स ब्युरोनं हा अलर्ट घोषित केला आहे. मुंबईतील सर्व महत्वाच्या स्थानक विमानतळ, भाभा अणूसंधोधन केंद्र, मंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या इमारतीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहेत. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. कोणत्या अज्ञात वस्तू आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला कळावावे.

हरियाणात अंबाला रेल्वे स्टेशनच्याबाहेर पार्क केलेल्या एका कारमधून पाच किलो आरडीएक्स, 5 डिटोनेटर्स आणि टायमर जप्त करण्यात आला. दिल्ली स्फोटानंतर इतक्या मोठ्याप्रमाणावर साठा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी केलेल्या एकत्रित कारवाईतही स्फोटकं जप्त केली आहेत. सध्या कार कोणाची आहे याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. तसेच स्टेशनवरकडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

close