टीम अण्णांमध्ये मतभेद

October 14, 2011 5:17 PM0 commentsViews: 8

14 ऑक्टोबर

जनलोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या टीम अण्णामध्ये आता मतभेदाची फळी निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी काश्मीरप्रश्नी प्रशांत भूषण यांच्या विधानाचा आक्षेप घेत भगतसिंग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी भूषण यांना बेदम मारहाण केली होती. याबद्दल आज खुद्द अण्णा हजारे यांनी प्रशांत भूषण यांचे विधान चुकीचे होते काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं स्पष्ट करत भूषण यांना टीममध्ये ठेवायचे की नाही याचा निर्णय टीम घेईल असा खुलासा केला. यानंतर लगेच अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत टीम अण्णामध्ये भूषण यांची गरज महत्वाची आहे असं स्पष्ट केलं. मात्र काश्मीर बाबत भूषण यांचे विधान चुकीचे होते या अण्णांच्या मताशी आपण सहमत आहोत असंही केजरीवाल यांनी सांगितले. टीम अण्णांमध्ये मतभेद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही रामलीला मैदानावरच्या आंदोलनावेळी स्वामी अग्निवेष टीममधून बाहेर पडले होते. अण्णांचे सहकारी हेकेखोर असल्याचा आरोप झाला होता.

दोन दिवसांपूर्वी टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकिल प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टात त्यांच्या 301 चेंबरमध्ये घुसून भगतसिंग क्रांतीसेनेच्या तीन कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नी आम्ही अनेक सामाजिक संघटनांशी मिळून काम करत आहोत.

लष्कराचा विशेषाधिकार कायदा काढण्यासाठी मोहीम सुरू आहे. विशेषाधिकारांमुळेच लष्कराचे जवान दबाव आणतात. हे एक कारण आहे. त्यामुळेच मानवाधिकार संघटना जे काही योग्य आहे ते करू शकतात. जिथं पीडित लोक आवाज उठवतात तिथं तो मुद्दा उचलायलाच हवा. अशा पीडितांचा तुम्ही मुद्दा हाती घेतला तर ते फायद्याचंच ठरेल. असं विधान केलं होतं याचा आक्षेप घेत भगतसिंग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तर काल पुन्हा भगतसिंग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णा समर्थकांना बेदम चोप दिला. भूषण यांना मारहाण करणार्‍या हल्लेखोरांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले यावेळी कोर्टाबाहेर जमलेले अण्णांना समर्थकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन अण्णा समर्थक गंभीर जखमी झाले होते.

आज अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रशांत भूषण यांचं टीम अण्णातून जाण्याचे संकेत दिले आहे. काश्मीर प्रश्नाबाबत भूषण यांनी केलेले विधान चुकीचे आहे असं स्पष्टपणे अण्णांनी सांगितले तसेच काश्मीरप्रश्नी भूषण याचं ते वैयक्तिक मत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर टीम अण्णा ही फक्त जनलोकपाल आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्णय करण्यासाठीच स्थापन झाली आहे. काश्मीरबाबातचं प्रशांत भूषण यांनी केलेंलं वक्तव हे टीमच्या सदस्यांना विचारून केलेलं नाही. त्यामुळे इथून पुढे त्यांना टीममध्ये ठेवायचं की नाही याविषयी आता इतर सदस्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं अण्णांनी म्हटलं आहे. तर अरविंद केजरीवाल यांनीही अण्णांच्या विधानाला दुजोरा देत प्रशांत भूषण यांचे काश्मिरवरील वक्तव्य हे वैयक्तिक मत आहे असं स्पष्ट केलं. आणि याचा टीम अण्णांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

मात्र प्रशांत भूषण हे टीम अण्णांचे महत्वाचे सदस्य आहेत. ते कोअर कमिटीचे सदस्य राहणारचं याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. इतकचं नाही तर अण्णांचे सहकारी आणि अण्णा समर्थकांवर होणारे हल्ले हे पूर्वनियोजित असल्याचा आरोपसुद्धा केजरीवाल यांनी केला. जे लोक भ्रष्टाचार करतात त्यांनी एकत्र येऊ न हे हल्ले केल्याचं त्यंानी म्हटलं आहे.

तर दिल्ली पोलीस या संदर्भात कारवाई करण्यास दिरंगाई का करत आहे असा सवालही त्यांनी केला. टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्यावर हल्ल्यानंतर टीम अण्णांनी आज दिल्लीत कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. आता अण्णा याबद्दल काय निर्णय घेता हे महत्वाचे आहे.

close