पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 9 टीम खेळणार !

October 14, 2011 12:19 PM0 commentsViews: 2

14 ऑक्टोबर

आयपीएल गर्व्हर्निंग काऊन्सिलची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुढच्या वर्षी होणार्‍या स्पर्धेच्या पाचव्या हंगामात नऊच टीम खेळणार आहे असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोची टीम बीसीसीआयने रद्द केली आहे. तर पंजाब आणि राजस्थान टीमचा वाद न्यायालयात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर 9 टीम घेऊन खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोची टीमशी करारबद्ध झालेले खेळाडू आणि टीममध्ये 5 परदेशी खेळाडू खेळवण्याच्या मुद्दावर पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे. पुढच्या वर्षी आयपीएल स्पर्धा 4 एप्रिल ते 27 मे दरम्यान होणार आहे. आणि स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा 3 एप्रिलला चेन्नईला होणार आहे.

close