टीम अण्णांना धमकीचे एसएमएस !

October 15, 2011 9:47 AM0 commentsViews: 6

15 ऑक्टोबर

टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता टीम अण्णांच्या सदस्यांना धमकीचे एसएमएस येत असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या एसएमएसद्वारेआमच्या ऑफिसवर हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आल्याचं केजरीवाल यांनी सांगिलं. केजरीवाल आज राळेगणमध्ये आले आहेत. अण्णांची भेट घेणार आहे. भेटीच्या आधी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पण या हल्ल्याना अहिंसेनं उत्तर दिलं जाईल असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

तर अण्णा हजारे यांनी उद्यापासून बेमुदत मौनव्रत पाळण्याचा इशारा दिला आहे. सरकारला मौनाचीच भाषा समजते. त्यामुळे आपण मौनव्रत पाळणार असल्याचं अण्णा म्हणाले आहेत. राळेगणमध्ये आज काही विद्यार्थ्यांनी अण्णांची भेट घेतली. त्यावेळेस अण्णांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपण आत्मशांती आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी मौनव्रत करणार असल्याचं सांगितलं. तुम्हाला कोणत्या राजकीय पक्षाला काही संदेश द्यायचा आहे का? या प्रश्नावर मात्र अण्णांनी काहीही बोलायचं टाळलं.

close