आघाडी टिकवायची की नाही हे एकदा दिल्लीत बसून ठरवा – पिचड

October 15, 2011 4:48 PM0 commentsViews: 1

15 ऑक्टोबर

लोडशेडिंगच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता चांगलीचं जुंपली आहे. या आघाडीला आता लोडशेडिंगच्या वादाचा शॉक बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात आता आणखी भर पडलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी माझं उर्जा खातं काढून घ्या असे उद्गार काढले होतं. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी माणिकराव ठाकरेंवर टीका केली. हे आघाडीचं सरकार टिकवायचं की नाही हे एकदा दिल्लीला विचारून ठरवून टाका, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी माणिकराव ठाकरेंवर सडकून टीका केली. माणिकराव ठाकरे यांनी वीजेच्या मुद्द्यावर वक्तव्य करण्याआधी किमान मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्यायला हवं होतं, असं म्हणत ही असली वक्तव्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं पिचड म्हणाले. तसेच लोडशेडिंग हा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभा केलेला प्रश्न नाही, सतत काही ना काही कारणाने राष्ट्रवादीला बदनाम करणं, त्रास देणं थांबवा, असंही पिचड म्हणाले आहेत.

close