नागपूरमध्ये 2 कोटींच्या खंडणीसाठी निष्पाप मुलाची हत्या

October 15, 2011 10:29 AM0 commentsViews: 2

15 ऑक्टोबर

नागपूरच्या वर्धमान नगर भागात राहणारे सुरूची मसाल्यांचे मालक प्रशांत कटारिया यांच्या आठ वर्षांच्या मुलाचं अपहरण करुन खून करण्यात आला. सूर्यानगर भागात आज सकाळी कुशचा मृतदेह आढळला. चार दिवसांपूर्वी कुशचं अपहरण झालं होतं. कटारिया यांच्या घरासमोर राहणार्‍या वीस वर्षाच्या आयुष पुगलियाने त्याचं अपहरण केलं असावं असा संशय पोलिसांना आधीच होता. त्यामुळे पोलिसांनी आयुषला घटनेनंतर तत्काळ अटक केली होती.

अखेर पोलिसांच्या तपासणीनंतर आयुषने हे कबूल केलं की त्यानेच कुशचं अपहरण केलं आणि त्याची हत्या केली. या हत्येत महत्त्वाची बाब म्हणजे कुशच्या अपहरणानंतर कटारिया कुटुंबीयाला दोन कोटींची मागणी केल्यानंतर काही तासातच कुशची हत्या केली. त्यामुळे कुशला चार दिवसांपूर्वीच मारल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान आयुषच्या या कृत्याचा धक्का बसल्याने त्याच्या वडिलांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. या हत्येमागे आणखी कोण आहेत त्याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेनंतर आयुष पुगलियाच्या घरापाशी नागरिकांनी जमाव करुन मोठी गर्दी केली आणि आयुषविरोधात घोषणा दिल्या.

close