येडियुरप्पांची कारागृहात रवानगी

October 15, 2011 11:54 AM0 commentsViews: 4

15 ऑक्टोबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना लोकायुक्त कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं. पोलीस येडियुरप्पांना अटक करण्यासाठी घरी गेले असता घरी नसल्याचे आढळून आले. मात्र अखेर येडियुरप्पांनी सेशन्य कोर्टापुढे शरणागती पत्कारली आहे. कोर्टाने येडियुरुप्पांना 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. येडियुरुप्पा यांना बेंगलूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दक्षिणेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आणणारे बी एस येडियुरप्पा आज गजाआड गेले. खाण घोटाळ्यामुळे काही दिवसांपूर्वीच खुर्ची गमावलेल्या येडियुरप्पांना एका भूखंड घोटाळ्यामुळे आज अटक करण्यात आली. त्यांना 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. पण सहजासहजी अटक करवून घेतील, ते येडियुरप्पा कसे?!

काही दिवसांपूर्वी कर्नाटकाचे सर्वेसर्वा असलेले येडियुरप्पा आज भ्रष्टाचार प्रकरणी गजाआड गेलेत. जे भूखंड प्रकरण थिल्लर आरोप म्हणून त्यांनी उडवून लावलं होतं. त्याच प्रकरणी त्यांना तुरुंगाची हवा खावी लागतेय. विशेष लोकायुक्त न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांची अटक निश्चित मानली जात होती. पण जेव्हा पोलीस येडियुरप्पांना अटक करायला गेले, तेव्हा ते घरी न सापडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शेवटपर्यंत हार न मानणार्‍या येडियुरप्पांनी अखेरीस नमतं घेतलं. आणि चार तासांनंतर कोर्टात समर्पण केलं. आता ते जामिनासाठी हायकोर्टात अर्ज करणार आहेतबंगळूरमधील एका भूखंडाचे आरक्षण काढून ती आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप येडियुरप्पांवर आहे. ही जागा गैरमार्गाने दिल्यामुळे सरकारी तिजोरीचं सुमारे 40 कोटी रुपयांचं नुकसान झालं. इतके दिवस येडियुरप्पांविरुद्ध लढणा-या काँग्रेसने हा स्वतःचा विजय असल्याचा दावा केला. तर भाजपने सावध भूमिका घेतली आहे. कोर्टाचा आदेश मान्य करत पक्षाने मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलंय.

येडियुरप्पांच्या अटकेमुळे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना मुक्तपणे शासन करता येणार असलं. तरी त्यामुळे अडवाणींची मात्र पंचाईत झाली. भ्रष्टाचाराविरुद्ध यात्रा काढणार्‍या अडवाणींना आता काँग्रेसच्या अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागलील.

येडियुरप्पांचा जामीन अर्ज सोमवारी हायकोर्टात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या या दक्षिणेकडच्या सगळ्यात मोठ्या नेत्याला किमान दोन रात्री तुरुंगात काढाव्या लागणार आहेत.

येडियुरप्पांवर ठपका !

- अवैध खाणकामामुळे राज्याचं 16 हजार कोटींचं नुकसान- अवैध काम करणार्‍या काही कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला पुरवले पैसे – येडियुरप्पांच्या कुटुंबीयांनी एक भूखंड 20 कोटींना एका खाण कंपनीला विकला- कंपनीनं येडियुरप्पांच्या ट्रस्टला 10 कोटींची देणगी दिली- त्यामुळे येडियुरप्पांवर फौैजदारी कारवाईची शिफारस – येडियुरप्पा सरकारमध्ये सहभागी असलेल्या रेड्डी बंधूंचा घोटाळ्यात मोठा हात – JDS नेते कुमारस्वामी आणि काँग्रेस खा.अनिल लाड यांच्या पत्नीही घोटाळ्यात

close