जैतापूर प्रकल्प लादण्यासाठी लोडशेडिंग – प्रकाश आंबेडकर

October 15, 2011 12:04 PM0 commentsViews: 134

15 ऑक्टोबर

लोडशेडिंगच्या मुद्यावर सरकारवर टीका होत असताना आता भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर एक गंभीर आरोप केला. जैतापूर अणुउर्जा प्रकल्प राज्यावर लादण्यासाठी कृत्रीम लोडशेडिंग निर्माण केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. बिहार आणि तेलंगणा इथल्या कोळसा खाणीतून किती कोळसा येतो याची आकडेवारी जाहीर करा असं थेट आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना दिलं. ते नागपूरमध्ये बोलत होते.

close