युवराजचा टेस्ट टीममध्ये कम बॅक

November 17, 2008 4:08 PM0 commentsViews: 6

17 नोव्हेंबर युवराजनं इंग्लंडविरुध्द सलग दोन सेंच्युरी ठोकल्यात. तरीही भारतीय टेस्ट टीममध्ये जागा मिळवायला युवराज सिंगला अजून थोडी वाट पहावी लागेल. पण या दोन सेंच्युरीजमुळे युवराजनं निवड समितीला विचार करायला आता भाग पाडलंय. गांगुलीच्या एक्झिटमुळे भारतानं क्रिकेटमधला महाराजा गमावला होता पण इंग्लंडविरुद्धच्या या वन डे सीरिजमध्ये भारतीय क्रिकेटला नवा युवराज मात्र नक्की मिळालाय. इंग्लंड विरुद्ध सलग दोन सेंच्युरी ठोकत युवराजनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आणि क्रिकेट समीक्षकांना त्याचं कौतुक करायला शब्द कमी पडले. अनेकांना युवराजची पहिल्या वन-डेतली 138 रन्सची तुफान इनिंग त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम इनिंग आहे असं वाटतंय.श्रीलंका दौरा आणि त्यानंतर चॅलेंजर ट्रॉफीत युवराजला आपला फॉर्म गवसला नव्हता आणि त्याच्या याच खराब फॉर्ममुळे त्याला वन डेच्या व्हाइस कॅप्टन पदावरून डच्चू देण्यात आला होता. पण आपल्या या इनिंगनं त्यानं आता त्याचा पुढच्या योजना स्पष्ट केल्या आहेत.सौरव गांगुलीच्या निवृत्तीमुळे भारतीय बॅटिंग ऑर्डरमधील एक महत्त्वाची जागा रिकामी झाली आहे. त्यासाठी आता एका उत्तम स्टाईल असलेल्या आक्रमक बॅट्समनची गरज आहे. जर युवराजनं राजकोटमध्ये दाखवलेली आपली ही कमाल संपूर्ण इंग्लंड दौ-यात कायम ठेवली तर सिलेक्टर्सना भारतीय टीममधील ही पोकळी भरायला जास्त कष्ट करायला लागणार नाहीत असंच दिसतंय.

close