राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक शितोळे पोलिसांना शरण

October 15, 2011 12:47 PM0 commentsViews: 12

15 ऑक्टोबर

पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा फरार नगरसेवक प्रशांत शितोळे अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्याला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्या तेरा दिवसांपासून शितोळे फरार होता. तुषार ढोरे या तरूणाच्या खुनाचा गुन्हा शितोळेंवर दाखल करण्यात आला होता. 3 ऑक्टोबर रोजी सांगवीत गणपती चौकात देवीच्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या हाणामारीत तुषार ढोरे या तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशांत शितोळे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close