सेझ प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात – नारायण राणे

October 15, 2011 12:50 PM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर

राज्यात मंजूर झालेल्या सर्व 125 सेझ प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात असल्याची कबुली खुद्द उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली. राज्यात सेझ सुरु करण्यास इच्छुक असणार्‍या उद्योजकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तसेच एस ई झेड उद्योजकांच्या काही मागण्या असल्यामुळे राज्यातील सर्व एस ई झेडचं भवितव्य बिकट असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एस ई झेडबाबत सरकारचे एकूणच धोरण अद्यापही ठरलेलं नसून येत्या अधिवेशनामध्ये याबाबतच्या विधेयकावर चर्चा होणार असल्याचंही राणे यांनी सिंधुदर्गातल्या पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे.

close