मच्छीमारांच्या प्रश्नी राणेंची यशस्वी मध्यस्थी

October 15, 2011 8:03 AM0 commentsViews: 1

15 ऑक्टोबर

सिंधुदुर्गातील पारंपारिक मच्छीमार आणि पर्ससीन जाळ्याच्या बोटीधारक मच्छीमारांमधल्या वादावर पालकमंत्री नारायण राणे यांनी तोडगा काढला आहे. या दोन्ही गटांत बैठक घेऊन राणे यांनी समुद्राच्या किनार्‍यापासून दहा फॅदमपर्यंत पर्ससीन जाळेधारक मच्छीमारांनी मासेमारी करु नये असे आदेश राणेंनी दिलेत. तसेच स्थानिक बाजारपेठेत या मोठ्या मच्छीमारांनी मासोळी विकू नये असा तोडगाही काढण्यात आला आहे. आयबीएन लोकमतने सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला होता. उद्या म्हणजे 16 ऑक्टोबरला यासंदर्भात दोन्ही गटांच्या मच्छीमारांमध्ये जिल्हाधिकार्‍यांचा सहीसह करार होणार आहे.

close