मध्यप्रदेशमध्येही स्फोटकांचा साठा जप्त

October 16, 2011 1:08 PM0 commentsViews: 2

16 ऑक्टोबर

हरियाणातल्या अंबालापाठोपाठ आज मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अमोनियम नायट्रेट आणि डिटोनेटर्सचे 15 डब्बे पोलिसांनी पकडले आहेत. रेवा शहरातल्या गंगोत्री कॉलोनीतल्या राजेश पटेल यांच्या घरातून ही स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. तर एक फरार आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं घटनेची संपूर्ण माहिती मागवली आहे.

close