डॉक्टरांचा संप अखेर मागे

October 15, 2011 5:49 PM0 commentsViews: 6

15 ऑक्टोबर

गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या डॉक्टरांचा संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची डॉक्टरांसोबत बैठक झाली. या बैठकीत सरकारने काही मागण्या मान्य केल्याचा डॉक्टरांच्या संघटनेचा दावा केला. डॉक्टरांना स्थायी करणार सगळी पदं भरल्यावर ड्युटींचे तास ठरवणार या आश्वासनांमुळे संप मागे घेतल्याचे डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले आहे. त्याचबरोबर आमच्या मागण्या 26 जानेवारीपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचाही इशाराही दिला. एकूण 12 हजार वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ आरोग्य अधिकार्‍यांचे पाच दिवसांपासून आंदोलन होतं. या आंदोलनामुळे विशेषत: ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे गरीब रूग्णांचे हाल सुरू होते. 2 ऑक्टोबरपासून डॉक्टरांनी हे आंदोलन सुरू केलं होतं. आधी रक्तदानासारखी वेगवेगळी आंदोलनं त्यांनी केली. पण सरकारने लक्ष दिलं नव्हत. त्यामुळे अखेर या डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसल होतं.

close