राळेगणचे सरपंच घेणार राहुल गांधींची भेट

October 16, 2011 1:27 PM0 commentsViews: 4

16 ऑक्टोबर

राळेगणसिध्दीचे सरपंच जयसिंग मापारी आता काँग्रेसचे युवराज राहुल गांधींची भेट घेणार आहेत. येत्या मंगळवारी ते दिल्लीत जाऊन राहुल यांची भेटण घेणार आहेत. मापारी यांच्यासोबत आणखी चार जण जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान अण्णा हजारे यांनी या भेटीला परवानगी दिल्याचं समजतंय. राळेगण हे महात्मा गांधींच्या स्वप्नातीलं गाव आहे. त्यामुळे राळेगणप्रमाणेच इतर गावांचा विकास कसा करायचा याविषयी चर्चा करण्यासाठी राहुल गांधींनी राळेगणच्या सरपंचांना दिल्ली भेटीचं आमंत्रण दिलंय समजतं आहे.

close