द्वारकेत मोदींचे 1 दिवसाचे उपोषण

October 16, 2011 10:01 AM0 commentsViews: 2

16 ऑक्टोबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सद्भावना मिशनच्या म्हणजेच उपोषणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात केली आहे. यावेळेला द्वारकेमध्ये मोदी एक दिवसाच्या उपोषणाला बसले आहेत. याहीवेळेला मोदींच्या उपोषणाला गुजराती जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल असं भाजपनं म्हटलं आहे. सकाळी 10 पासून सुरु झालेलं मोदींचे उपोषण संध्याकाळपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे खासदार विक्रम मडम यांनीही द्वारकेमध्येच उपोषणाला सुरुवात केली आहे.

close