रणधुमाळी निवडणुकांची…

November 17, 2008 5:58 PM0 commentsViews: 3

रणधुमाळी निवडणुकांची…17 नोव्हेंबर, दिल्ली राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजस्थानात भाजपसाठी आजचा दिवस तसा चांगला होता. बसपा नेते नटवर सिंग यांचा मुलगा जगत सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. वसुंधरा राजे यांच्या उपस्थित त्यांनी पक्षात प्रवेश केलाय. वसुंधरा राजे यांनीही आज त्यांचा उमेदवारी अर्ज झलवार मतदारसंघातून भरला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात आधीचे मुद्दे विसरून काँग्रेसनंच नव्याच मुद्याला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. 2010 साली दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्स,राजधानीला ऊर्जासंपन्न करण्यासाठी प्रयत्न आणि सर्वशिक्षा अभियानातून शिक्षणाचा विकास करण्याचं आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यात दिलंय. छत्तीसगडमध्ये साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी मायावतींच्या बसपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तिथल्या प्रचारसभांमध्ये मायावतींनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली. या दोन पक्षांकडून स्थानिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

close