स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एकांकिकातून जनजागृती

October 16, 2011 7:45 AM0 commentsViews: 271

16 ऑक्टोबर

बीड जिल्ह्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध या विषयावर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बीडच्या कला मंडळाचा प्रथम तर औरंगाबादच्या स्नेह विकास महिला मंडळाचा द्वितीय क्रमांक आला. या स्पर्थेत 17 संघांनी भाग घेतला होता. बीड जिल्ह्यात मुलींचा जन्म दर हजार मुलांमागे 801 मुली असा आहे. त्यामुळे हा जन्मदर समान करण्यासाठी अश्या उपक्रमांची मदत घेतली जात आहे. यावेळी सिने अभिनेता नंदू माधव हे उपस्थित हाते.

close