नागपुरात इतवारी बाजारपेठेत आगीत 2 दुकान खाक

October 16, 2011 10:12 AM0 commentsViews: 4

16 ऑक्टोबर

नागपुरात अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या इतवारी बाजारपेठ आज सकाळी सहाच्या दरम्यान आग लागली. बाजारपेठेतील फोम आणि कपड्याच्या दुकानाला ही आग लागल्याने ती जास्त पसरली. त्यामुळे इथं आग पसरण्याची भीती जास्त होती. बाजारपेठेत लागलेली आग आता आटोक्यात आणण्यात फायरब्रिगेडला यश आलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची फायरब्रिगेडची माहिती आहे. दरम्यान, या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली आहेत.

close