भावी महिला नगसेविकांसाठी कार्यशाळेचं आयोजन

October 16, 2011 1:50 PM0 commentsViews: 10

16 ऑक्टोबर

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण जाहीर झालं आहे. या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त महिला राजकारणात याव्यात आणि त्यांच्यातील नेतृत्वगूण विकसीत व्हावेत. तसेच महिलांचे राजकीय सक्षमिकरण व्हावे यासाठी भारतीय स्त्री शक्तीतर्फे मुंबईत एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेषत: मुंबईत नगरसेवक म्हणून काम करताना काय अडचणी येतात, आपल्या विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काय प्रयत्न केले पाहिजेत अशा अनेक विषयांवर या कार्यशाळेत चर्चासत्र घेण्यात आली. प्रत्येक इच्छुक महिलेला एक सक्षम उमेदवार करण्यासाठी या कार्यशाळेचं प्रयोजन असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

close