येडियुरप्पा हॉस्पिटलमध्ये दाखल

October 16, 2011 10:21 AM0 commentsViews:

16 ऑक्टोबर

सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना काल रात्री उशीरा खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आल्यानंतर काही तासातच त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्यामुळे त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्यासह काही मंत्र्यांनी येडियुरप्पा यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. येडियुरप्पांना आणखी 49 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती सदानंद गौडा यांनी दिली. सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणी शनिवारी येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या विशेष लोकायुक्त कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना तुरूंगात हलवण्यात आलं होतं.

close