बुलढाण्यात शेतकरी संघटनेचं वीज तोडो आंदोलन

October 16, 2011 12:55 PM0 commentsViews: 3

16 ऑक्टोबर

बुलढाण्यात लोडशेडिंग विरोधात शेतकरी संघटनेनं आज आक्रमक होत माजी आरोग्यमंत्री आमदार डॉ.राजेन्द्र शिंगणे यांच्या घराची वीज तोडण्याचा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांचं आंदोलन हाणून पाडत या ताब्यात घेतलं. आमदार डॉ.शिंगणे हे ग्रामीण भागातील भारनियमन कमी होण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचे या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. भारनियमन थांबत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना आंदोलन करत राहील. आणि या तातडीने भारनियमन कमी केलं नाही तर यापेक्षा अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे.

close