विधानमंडळाचा अमृत महोत्सव 18 आणि 19 ऑक्टोबरला

October 16, 2011 11:10 AM0 commentsViews: 11

16 ऑक्टोबर

विधानमंडळाच्या अमृत महोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रम आटोपशीर करण्यात आला. राज्य अमृतमहोत्सवी सोहळा 18 आणि 19 ऑक्टोबरला होणार आहे. राज्य सरकारच्या अमृतमहोत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमासाठी पर्यावरण खात्यानं रात्री दहा नंतर लाऊड स्पीकरसाठी मनाई केली आहे.

परवानगी नाकारल्याचं पत्र राज्य पर्यावरण खात्याने विधानमंडळ सचिवालयाला दिलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमावलींमुळे ही परवानगी नाकारण्यात आल्याच पर्यावरण खात्याच्या सचिव वलसा नायर सिंग यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं. विधान मंडळ सचिवालयाने मुंबई जिल्हाधिकार्‍यांकडे 18 ऑक्टोबरला रात्री 10 नंतर लाऊड स्पिकरसाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती.

पण त्यावर विधान भवनाच्या खुल्या मंडपात रात्री दहानंतर लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही असं विधानमंडळ सचिवालयाला सांगण्यात आल्याची माहिती वलसा नायर सिंग यानी दिली आहे. दरम्यान राज्य पर्यावरण खात्याच्या आक्षेपानंतर, विधीमंडळ सचिवालयाने सांस्कृतिक कार्यक्रम रात्री दहाच्या आत आटोपण्याचा निर्णय घेतला असं समजतंय. आधी 19 आणि 20 जुलैला होणारा हा अमृतमहोत्सवी सोहळा 13 जुलैच्या मुंबई बॉम्बस्फोटामुळे पुढे ढकलण्यात आला. तो आता 18 आणि 19 ऑक्टोबरला होतोय.

close