पुढच्या वर्षी मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही – उध्दव ठाकरे

October 16, 2011 11:28 AM0 commentsViews: 2

16 ऑक्टोबर

मुंबईत पुढच्या वर्षीपर्यंत एकही खड्डा शिल्लक राहाणार नाही असं आश्वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलं. विक्रोळीत एका उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गेले काही दिवस मुंबईतल्या खड्डयांच्या विषयावरून वातावरण तापलं आहे. मुंबईतल्या खड्‌ड्यांसाठी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेना भाजपलाच विरोधकांकडून टार्गेट करण्यात येतंय. पण आम्ही केलेल्या चांगल्या कामांची दखल सुद्धा आमच्या विरोधकांना घ्यावी लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

close