ऑलराउडर युवराज सिंगची जबरदस्त खेळी

November 17, 2008 6:44 PM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर इंदूरइंग्लंडविरुध्दच्या दुस-या वन डेतही युवराजनं जबरदस्त खेळ करत सलग दुसरी सेंच्युरी ठोकली . त्याच्या या जबरदस्त इनिंगनं इंग्लंडविरुध्द भारताला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलयं. युवराज सिंगनं बॅटिंगमध्ये तर आपली कमाल दाखवलीच. पण त्यानं बॉलिंगमध्येही दमदार कामगिरी करत आपल्या ऑलराऊंडर खेळाची झलक दाखवली. युवराजनं दहा ओव्हरमध्ये फक्त अठ्ठावीस रन्स देत, चार विकेट घेतल्या. इंग्लंडचाओपनिंग बॅट्समन इयान बेल झटपट आऊट झाल्यानंतर मॅट प्रायर आणि ओवेश शहा या दोघांनी दमदार बॅटिंग करत डाव सावरला. पण भारताचा कॅप्टन धोणीनं बॉल युवराज सिंगच्या हाती दिला. आणि मॅचचं चित्रच पालटलं. युवराजनं बॉलिंगच्या पहिल्या सत्रात प्रायर आणि शहाला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. तर दुस-या सत्राच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अ‍ॅण्ड्रयू फ्लिंटॉफ आणि कॅप्टन केविन पीटरसनला आऊट करत भारताला विजय मिळवून दिला.

close