खडकवासल्यात अजितदादांना धक्का ; भाजपचे तापकीर विजयी

October 17, 2011 5:53 PM0 commentsViews: 6

17 ऑक्टोबर

पुण्यात खडकवासला येथे झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजपचे उमदेवार भीमराव तापकीर 3 हजार 625 मतांनी विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे यांचा धक्कादायक पराभवाला सामोर जावं लागलं आहे. तापकीर यांना 59 हजार 634 मतं मिळाली तर वांजळे यांना 56 हजार 9 मतं मिळाली. ही निवडणूक राज्याच्या नेत्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या अकाली निधनानंतर या जागी ही निवडणूक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: या ठिकाणी येऊन प्रचार केला होता. हर्षदा वांजळे यांना सहानुभूतीचा फायदा मिळेल का मनसेनं उमेदवार उभा न केल्याने त्याचा फायदा भाजपला मिळेल याबाबत उत्सुकता होती. सुरूवातीच्या काही फेर्‍यांमध्ये वांजळे आघाडीवर होत्या. पण नंतर तापकीर यांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकली. शेवटच्या काही फेर्‍यांमध्ये तापकीर यांची आघाडी कमी झाली होती. महापालिका निवडणुकीआधी ही पोटनिवडणूक जिंकल्याने भाजपमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे.

खडकवासला निवडणूक मतांची तुलना

2011भीमराव तापकीर (भाजप) -59 हजार 634 हर्षदा वांजळे (राष्ट्रवादी) -56 हजार 09 2009रमेश वांजळे (मनसे) – 78,000मुरलीधर मोहोळ (भाजप) – 29,000विकास दांगट (राष्ट्रवादी) – 56,000

close