हिसार पोटनिवडणुकीत एनडीएचे बिश्नोई विजयी ;युपीए तिसर्‍या स्थानावर

October 17, 2011 9:58 AM0 commentsViews: 4

17 ऑक्टोबर

हरियाणाच्या हिसार पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. आणि एनडीएची सरशी झाली. हरियाणा जनहित काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई यांचा दणदणीत विजय झाला आहे. इंडियन नॅशनल लोकदलाचे अजयसिंह चौटाला दुसर्‍या क्रमांकावर तर काँग्रेसचे जयप्रकाश तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. हरियाणा जनहित काँग्रेसची भाजपसोबत आघाडी आहे. या निवडणुकीत टीम अण्णांनी काँग्रेसविरोधात जोरदार प्रचार केला होता. पण विजयाचे श्रेय टीम अण्णांना द्यायला बिश्नोई यांनी नकार दिला आहे. दुसरीकडे, हा टीम अण्णांचा विजय नाही तर पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात प्रचार केला होता, तर काँग्रेसचाच उमेदवार इथं निवडून यायला हवा होता, असं वीरप्पा मोईली यांनी म्हटलं आहे.

close