संजीव भट यांना अखेर जामीन

October 17, 2011 8:47 AM0 commentsViews: 2

17 ऑक्टोबर

गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना अखेर जामीन मिळाला आहे. 18 दिवसांनंतर भट यांना अहमदाबाद जिल्हा कोर्टाने जामीन दिला. मोदी यांच्याविरोधात खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या आरोपावरून गुजरातचे संजीव भट यांना अटक करण्यात आली होती. याविरोधात तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. भट यांना अटक केल्यानंतर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे संजीव भट यांच्या श्वेता भट यांनी सांगितलं होतं. त्यानंतर गुजरातच्या आयपीएस अधिकार्‍यांनी एकत्र येऊन मोदी यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. आज अखेर भट यांना जामीन मिळाला. हा कायद्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया साबरमती जेलमधून बाहेर आल्यानंतर संजीव भट यांनी दिली.

close