गोंदियात पुन्हा 800 किलो भेसळयुक्त खवा जप्त

October 17, 2011 10:36 AM0 commentsViews: 23

17 ऑक्टोबर

ऐन सणासुदीच्या तोंडावर जवळपास 800 किलो भेसळयुक्त खवा आज गोंदियात जप्त करण्यात आला आहे. रामनगरमध्ये 250 किलो तर गोडावूनमध्ये 550 किलो खवा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या विषेश पथकाने ही कारवाई केली. विषेश म्हणजे गेल्या बुधवारीच जिल्ह्यात 600 किलो भेसळयुक्त आणि रसायनमिश्रीत खवा आणि कुंदा जप्त करण्यात आला होता. तर मुंबईतही नालासोपार्‍यामध्ये पेल्हार इथून 500 किलो भेसळयुक्त खवा पोलिसांनी जप्त केला आहे. एका खासगी बस मधून भेसळयुक्त खवा मुंबईच्या दिशेने नेला जात होता. याची खबर पोलिसांना मिळतातच ही कारवाई करण्यात आली.

close