लोडशेडिंगवरून ‘बिघाडी’ रोखण्यास मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

October 17, 2011 12:33 PM0 commentsViews: 1

17 ऑक्टोबर

राज्यात होत असलेल्या लोडशेडिंगवरुन सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप होत असताना आता याप्रकरणात खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घातलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक बोलावली होती पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. लोडशेडिंगवरुन सध्या अजित पवार विरुद्ध काँग्रेस असा वाद पेटला आहे. लोडशेडिंगविरोधात सुरू असलेली आंदोलनं राजकीय असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता, पण हा जनतेच्या संतापाचा उद्रेक असल्याचं वक्तव्य करत माणिकराव ठाकरेंनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यानंतर मधुकर पिचड यांनी आघाडी ठेवायची की नाही याचा निर्णय दिल्लीत बसून ठरवा असा टोला लगावला होता.

close