बीसीसीआयनं घेतलं धोणीच्या जिंकण्याचं टेन्शन

November 17, 2008 6:01 PM0 commentsViews: 8

17 नोव्हेंबरधोणीच्या सातत्यानं जिकंण्याचं टेन्शन खरं तर प्रतिस्पर्धी टीमनं घ्यायला हवंय. पण याउलट भारतीय क्रिकेट बोर्डानं त्याच्या जिंकण्याचं टेन्शन घेतलंय. यावर तुम्हचा विश्वास बसत नसेल. पण हे सत्य आहे. धोणी जिंकतोय. सातत्यानं जिंकतोय.पण त्याच्या जिंकण्याचं टेन्शन भारतीय क्रिकेट बोर्डाला आलयं. कारण तो असाच जिंकत राहीला तर भारत आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातलं धोणीचं क्रिकेट वेळापत्रक पहा. दोन डिसेंबरला तो नवी दिल्लीत इंग्लंड विरुद्धची सातवी वन डे खेळेल .त्यानंतर लगेचच चार तारखेला चँपियन्स लीगमधली त्याची पहिली मॅच आहे मुंबईत.चेन्नई सुपर किंगचा तो कॅप्टन आहे. तिथून एका दिवसाच्या विश्रांतीनंतर लगेचच तो जाईल पुढच्या मॅचसाठी चेन्नईला.चेन्नईला त्याला सलग दोन दिवस चँपियन्स लीगच्या दोन मॅच खेळायच्या आहेत.आणि त्याची टीम जर सेमी फायनलला पोहोचलीच तर त्याला लगेचच 9 तारखेला चेन्नई किंवा 8 तारखेला बंगलोरमध्ये लीगची सेमी फायनल मॅच खेळायची आहे.आणि त्याची टीम जर फायनलला गेली तर लगेच दहा तारखेला त्याला चेन्नईत यावं लागेल. धोणीचा धावपळ इथंच संपत नाही.तर चँपियन्स लीगच्या दुस-याच दिवशी अकरा तारखेपासून इंग्लंड बरोबरची पहिली टेस्ट सुरु होतेय. चेन्नईमध्ये रात्री चॅम्पियन्स लीगची फायनल खेळल्यावर टेस्टसाठी धोणीला सकाळी 9 वाजता टॉस करायला अहमदाबादला पोहचणे केवळं अशक्य आहे. आणि यासाठीचं बीसीसीआयने पहिली टेस्ट एक दिवसाने पुढे ढकलण्याची शिफारस इंग्लंड बोर्डाला केली आहे. पण इंग्लंड टीमला हा बदल मान्य नाही. कारण, त्यामुळे पहिल्या आणि दुस-या टेस्टमध्ये केवळ दोनच दिवसांचं अंतर राहतं.

close