बदला क्रमांक 2 ; इंग्लंडवर भारताचा ‘विराट’ विजय

October 17, 2011 4:23 PM0 commentsViews: 2

17 ऑक्टोबर

दिल्ली वन डे जिंकत भारताने इंग्लंडविरुध्द सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली आहे. भारतीय बॉलर्सची प्रभावी बॉलिंग आणि विराट कोहलीच्या सेंच्युरीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर 8 विकेट राखून दणदणीत मात केली. टॉस जिंकून इंग्लडने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण कॅप्टन ऍलिस्टर कुकचा हा निर्णय सपशेल फसला. विनय कुमार आणि उमेश यादव या फास्ट बॉलरने इंग्लंडची इनिंग अवघ्या 237 रन्समध्ये गुंडाळली. विनय कुमारने 4 विकेट घेतल्या. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनर पार्थिव पटेल आणि अजिंक्य रहाणे झटपट आऊट झाले. पण यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरने फटकेबाजी करत 37 व्या ओव्हरमध्येच भारताला विजय मिळवून दिला. कोहलीने शानदार सेंच्युरी ठोकली. तर गंभीरनं नॉटआऊट 84 रन्स केले.

close