हा लोकशाहीवरचा हल्ला – अण्णा हजारे

October 18, 2011 4:41 PM0 commentsViews: 1

18 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या चप्पलफेक प्रकरणी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी निषेध व्यक्त केला. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. भ्रष्टाचाराविरूध्द लढणार्‍यांवर असे हल्ले झाले तर काय होणार? देशासाठी अनेक जण शहीद झालेत. आता चप्पलच नाही तर गोळ्या खाण्याची आणि लाठ्या झेलण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. मौन सुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मी लखनौला जाणार आहे. अशी लेखी प्रतिक्रिया अण्णांनी दिली.

close