अण्णांना कायमस्वरूपी झेड सुरक्षा

October 19, 2011 9:46 AM0 commentsViews: 8

19 ऑक्टोबर

टीम अण्णांच्या सदस्यांवर होत असलेले हल्ले बघता जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना कायमस्वरुपी झेड सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राळेगणसिध्दीला आता पोलीस पहारा वाढवण्यात आला आहे. याचसंबंधी अतिरीक्त पोलिस महासंचालक सत्यपाल सिंग आज राळेगणला जाणार आहेत. कडक तपासणी केल्याशिवाय कुणालाही अण्णांना भेटू दिलं जात नाही. पण आता या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. काल मंगळवारी टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर चप्पलफेक करण्याची घटना लखनौ येथे घडली. या अगोदरही प्रशांत भूषण यांनाही भगतसींग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. आणि दुसर्‍यादिवशीच अण्णा समर्थकांनाही जबर मारहाण करण्यात आली होती. अण्णा दिल्लीवरील रामलीला मैदानावर आपलं उपोषण संपून आल्यानंतर राज्य सरकारने अण्णांना झेड सुरक्षा देण्याचा आग्रह धरला होता मात्र अण्णांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. आता एकाच महिन्यात टीम अण्णांवर झालेला तिसरा हल्ला पाहता सरकारने अण्णांना कायम स्वरूपी झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहेत.

close