रत्नागिरीत केमिकलयुक्त पाणी सोनपात्राच्‍या नदीपात्रात

October 19, 2011 10:11 AM0 commentsViews: 23

19 ऑक्टोबर

रत्नागिरीमधील लोटे केमिकल इंडस्ट्रीजमधून होणार्‍या घातक प्रदुषणाला आळा घालण्यात प्रदुषण नियंत्रण मंडळ पूर्णपणे अपयशी ठरल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. लोटेच्या काही केमिकल इंडस्ट्रीजमधून विषारी केमिकलयुक्त पाणी उघड्यावरच सोडून देण्यात आलं आहे. हे केमिकल एका ओढ्यातून सोनपात्रा नदीला जाऊन मिळत आहे. केमिकल वेस्टवर प्रक्रिया करणारी लोटेची CETP यंत्रणा पूर्णपणे निकामी झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या वस्तीला याचा धोका निर्माण झाला आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी मात्र अजून कोणावरही गुन्हा नोंदवलेला नाही.

close