तक्रार न घेणार्‍या महावितरण अधिकार्‍यांच्या पगारातून दंडवसुली

October 19, 2011 10:30 AM0 commentsViews: 14

19 ऑक्टोबर

वीज ग्राहकांच्या तक्रारींची दखल न घेतल्याने महावितरणच्या अधिकार्‍यांच्या पगारातून दंड वसुलीचे आदेश महावितरणच्या तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. मनमाडचे दुकानदार दिनेश देव यांनी एक तक्रार केली होती. त्यांनी वीज कनेक्शन घेतल्यापासून त्यांना बीलच आलं नाही. त्याबद्दल वेळोवेळी त्यांनी अनेक तक्रारी केल्या. पण महावितरणच्या अधिकार्‍यांनी त्याची दखल घेतली नाही. आणि अचानक 4 लाखांच्या थकबाकीचे बील त्यांनी पाठवले. त्याविरोधात दिनेश देव यांनी महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. त्यावेळी हे 4 लाख रुपये जबाबदार अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पगारातून वसूल केले जावेत असे आदेश देण्यात आले आहे.

तर महावितरणचे अजब प्रकार नागपूरमध्येही घडत आहे. नागपूरमध्ये महावितरणने वीज वितरणाची जवाबदारी स्पँनको या खाजगी कंपनीला दिली आहे. पण गेल्या काही महिन्यात अनेक ग्राहकांना अचानक जादा बिल आल्याच आता उघड झालं आहे. नागपूरच्या ज्योती शिवनानी यांच्या घरी दोन जण राहतात. गेल्या महिन्यात त्यांनी अकराशे रूपये वीज बिल भरलं होतं. पण सध्या चालू महिन्यात त्यांना चक्क 48 हजाराच बिल आलंय.

close